शारदोत्‍सव रंगणार मेहंदीच्‍या रंगात

0

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव (MP Cultural Festival) सम‍ितीचा उपक्रम

आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव असणार्‍या शारदोत्‍सवाला 15 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होत आहे. शहरातील शारदोत्‍सव मंडळांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण असून खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समिती त्‍यात यंदाही मेहंदीचे रंग भरणार आहे.

कला, साहित्‍य, संस्‍कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी सण, उत्‍सवांना ‘सांस्कृतिक’ रूप दिले असून त्‍यातीलच हा एक उपक्रम होय. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍यावतीने शहराच्‍या सहा विधानसभा क्षेत्रांमध्‍ये 300 हून अधिक शारदोत्सव मंडळांमध्‍ये शहरातील नामांकित मेहंदी कलाकारांसह हौशी कलाकार सहभागी होणार असून भाविक मह‍िलांच्‍या हातावर सुबक मेहंदी काढणार आहेत. अधिक माहितीसाठी संयोजिका मनिषा काशीकर यांच्‍याशी संपर्क साधावा.

या उपक्रमात शारदोत्‍सव मंडळांनी मोठ्या संख्‍येने सहभाग घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले व कार्यकारी मंडळाने केले आहे. मंडळांनी नावे नोंदणीसाठी पश्चिम मंडळ – प्रगती पाटील, कविता सरदार, मनोरमा ताई, सिमरन कौर दक्षिण पश्चिम – वर्षा चौधरी, अश्विनी डबली, पूर्व मंडळ – संतोष लढ्ढा, मनिषा कोठे, निशा भोयर, वैशाली फुलझेले, दक्षिण मंडळ – ज्योती देवघरे , प्रिती राजदेरकर, दिपाली ढोमणे, मध्‍य मंडळ – सारिका नांदूरकर, अनिता काशीकर रेखा निमजे व उत्‍तर मंडळ – डॉ. सरिता माने, आशा गुप्ता यांचेशी संपर्क साधावा.