प्रफुल्ल पटेलांविरुद्ध शरद पवार गट सक्रीय

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) शिष्टमंडळाने आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गटाने यापूर्वी ही मागणी केली होती. दहाव्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. मात्र, कारवाई न झाल्याने शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार वंदना चव्हाण यांनी यासंदर्भात पत्र दिले होते.