

– महाराष्ट्रातील एकमेव आयोजन
– किमया विशेषांक डिजिटल स्वरुपात
नागपूर,(Nagpur)
नाथ संप्रदायातील संतसज्जनांनी आपल्याला दिलेला अमूल्य ठेवा म्हणजे शाबरी कवच! शाबरी कवच हा बीजमंत्रांचा समूह असून, कवचाच्या नियमित पठणाचे अद्भुत परिणाम भाविकांनी अनुभवले आहेत. श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या वतीने, दरवर्षी शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते. देशाच्या विविध भागांमधून भाविक या उपक्रमात सहभागी होतात. ज्या भाविकांना सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, ते ऑनलाईन माध्यमातून या आयोजनाचा लाभ घेतात.
श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या ( Shri Mukund Dada Andhare Navnath Shaktipeeth Trust) वतीने, यंदा हनुमान मंदिर, रवींद्र सभागृहाच्या समोर, रवींद्र नगर येथे शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळा आयोजिण्यात आला आहे.
शुक्रवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप शाबरी मातेची महाआरती आणि महाप्रसादाने होणार आहे. या सोहळ्याला पारंपरिक वेषातच उपस्थित रहावयाचे असून, भाविकांनी बहुसंख्येने उमा-महादेवाच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ टड्ढस्टच्या अध्यक्ष सुवर्णा अंधारे आणि इतर पदाधिकायाऱ्यांनी केले आहे. या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे औचित्य साधून प्रकाशित होणारा ‘किमया’ हा वार्षिकांक डिजिटल आणि त्रैमासिक स्वरुपात प्रकाशित होणार आहे. पूर्णत: नाथ संप्रदायाला समर्पित आणि संप्रदायाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त ‘किमया’ विशेषांक अभ्यासक आणि भाविकांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.
काय आहे शाबरी कवच?
हिंदू धर्मात बीजमंत्रांना विशेष महत्त्व आहे. विविध श्लोक, स्तोत्रांमध्ये बीजमंत्रांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नाथ संप्रदायाचे आद्य महादेव आणि देवी पार्वतीच्या भिल्ल आणि भिल्लीणीच्या वेषातील संवादाची भाषा शाबरी आहे. नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या नवनाथांनी आपल्या उपासनेने देवीदेवतांचा आशिर्वाद प्राप्त केला आणि या दैवतांची कृपा सामान्यजनांना लाभावी, यासाठी शाबरी कवच या स्तोत्रसमूहाची रचना करण्यात आली आहे. सामान्य माणसाच्या भौतिक समस्या संपुष्टात याव्यात आणि त्यांना सुखी-सकारात्मक जीवन जगण्यासह संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळावी, या वैयक्तिक संकल्पातून शाबरी कवचाची आवर्तने करावीत, अशी मान्यता आहे. शिवाय, ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या पसायदानातील उक्तीनुसार, समाजातील प्रत्येक वंचिताच्या उत्थानाकरीता शाबरी कवचाचे पठण लाभदायक ठरत असल्याचे संदर्भ आहेत.