

नागपूर (Nagpur) :- बुटीबोरी स्थित सतरा वर्षीय आंचल सैनी हिने जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस उर्वशी 2024 सीजन 3’ चे विजेतेपद पटकावले.
आंचल ही बाबूराम सैनी व काजल सैनी यांची कन्या असून बाराव्या वर्गात शिकते. ती राज्यस्तरावरील हॉकी खेळाडू असून अनेक हॉकी स्पर्धांमध्ये तिने पदके पटकावलेली आहेत. तिचा सचिन सैनी हा लहान भाऊ दहाव्या वर्गात शिकत आहे. आंचलने सात दिवस चाललेल्या या स्पर्धेत ग्रूमिंग, पोर्टफोलिओ शूट, टॅलेंट राऊंड, सेल्फ स्टाइलिंग राऊंड, सेल्फ डिफेन्स सेशन, पर्यावरणासाठी हवन पूजा, वृक्षारोपण यासारख्या अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला. देशभरातून 1200 मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून आंचलने उत्कृष्ट सादरीकरण करीत अव्वल स्थान प्राप्त केले. तिला 11 लाखांचे रोख बक्षीस, तसेच, बॉलिवूड चित्रपट आणि संगीत व्हिडिओ अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजक विरेंद्र अग्रवाल व शो संचालक रचना चौधरी यांनी सांगितले.
या किताबामुळे आत्मविश्वास वाढला असून मला मॉडेलिंगमध्ये करीअर करायचे असून एअरहोस्टेस होण्याचा मानस आहे, असे आंचल सैनी म्हणाली.