

नागपूर(Nagpur) :- रविवार दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता. प्रियदर्शनी स्कूल,किष्णा नगर, गिट्टीखदान, नागपूर येथे वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूरचे संस्थापक नरेश वामनराव बरडे यांच्या तर्फे मा.ना.श्री नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, भारत सरकार यांचा वाढदिवसानिमित्त पश्चिम नागपूर मतदार संघात आयोजित भव्य रोगनिदान, निःशुल्क नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप सेवापर्व क्रं. ११ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मा.ना.श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार व मा.ना. श्री. देवेन्द्रजी फडणवीस, उपुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा, नागपूर या दोन्ही नेत्यांचा वाढदिवसाचे निमित्त दि. २७ मे २०२४ ते दि. २२ जुलै २०२४ पर्यंत पश्चिम नागपूर मतदार संघात वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर तर्फे विविध ३० ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबीराचे उद्घाटन सौ. रजनीताई पेंदाम, मुख्याध्यापिका, भारतीय कुषी महाविद्यालय, गीता नगर, सौ. लक्ष्मी शर्मा, सचिव, वैभव लक्ष्मी सामाजिक संस्था, सौ. साधना नरेश बरडे, माजी नगरसेविका, तथा उपाध्यक्ष, वामनराव बरडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर यांनी केले. या कार्यक्रमाचा वेळी सौ. प्रभाताई वानखेडे, सौ. मंदाताई चौधरी, सुरेश कोंगे , सरदार प्रभाकर ठाकरे, प्रकाश वर्मा, यांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता संयोजक विनित शर्मा, विशाल बघेले , आयुष्य तुपकर, अजय मोरे, मयुर विश्वकर्मा, नयन विश्वकर्मा, शुभम शाहु, शिवपाल गंवडर, मनिष दुबे, आरती मागंलकर, उमेश सिरशाम, साहील थुल, विनय शर्मा, अनिकेत पांडे, भुषण मुरकुटे, हिमांशु सोमलवार, दर्शन गौर, प्रमोद भुसारी, शंकर राऊत, दिलीप लांडगे, विजय डोंगरे, रितीक बनसोड, क्रिष्णा सातनकर, योगेश नारनवरे, स्वप्नील डेहनकर पक्षाचे कार्यकर्ते व परिसरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.