सेवाग्राम विकास आराखड्यातील पथदिवे सहा वर्षांपासून बंद; नागरिकांमध्ये तीव्र संताप

0

वर्धा/ – रविराज घुमे, वर्धा – सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सहा वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुभाजकावर उभे केलेले पथदिव्यांचे खांब आजतागायत न वापरता पडून आहेत. हे दिवे अद्याप सुरूच न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, “बेशर्मी की हद आहे!” अशी संतप्त प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींविरोधात व्यक्त होत आहे.

२२ जुलै रोजी सेवाग्राममधील चरखा सभागृहात मोतीबिंदू मुक्त जिल्हा अभियानांतर्गत भव्य शिबिराचे आयोजन झाले. या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी नेत्यांचे पोस्टर आणि होर्डिंग या निष्क्रिय खांबांवर झळकत होते.

“गांधी फॉर टूमॉरो” या काँग्रेसच्या संकल्पनेअंतर्गत माजी पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी सेवाग्राम आश्रम आणि परिसराच्या विकासाची रूपरेषा आखली होती. सत्ता बदल्यानंतर भाजप सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘सेवाग्राम विकास आराखडा’ ठेवले आणि माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी भरपूर निधीही उपलब्ध करून दिला.

या योजनेत सेवाग्राम शहराबरोबरच पवनार व वरूड या गावांचाही समावेश करण्यात आला. मात्र अनेक कामे निधीअभावी अपूर्ण राहिली आहेत. सेवाग्राम मेडिकल चौकातील सुशोभीकरणाची कामे अपूर्ण असून, तेथे आता गवत उगवले आहे, तर भिंतींना तडे गेले आहेत.

सेवाग्राम आश्रम ते वर्धा गांधी पुतळा या मार्गावर पथदिवे उभारले तरीही ते सुरू झालेले नाहीत. नागरिकांनी यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी दिव्यांची अपेक्षा ठेवली होती, मात्र दिवे न लागल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारच कायम आहे. या खांबांचा वापर फक्त नेत्यांच्या पोस्टर आणि जाहिरातींसाठी होत आहे.


भाजप आणि काँग्रेस दोघांचीही दुर्लक्षधोड

सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात निधी मिळाल्यानंतर कामांची सुरुवात झाली, मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पालकमंत्री सुनील केदार यांनी केवळ बैठका घेऊन तारीखवर तारीख दिली. २ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करा, असे आदेश देण्यात आले, परंतु प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नाही. पथदिवे सुरू होणार, अशी आशा होती, तीही अपूर्णच राहिली.


हायमास्ट लाईट १० वर्षांपासून बंद

सेवाग्राम चौकातील हायमास्ट लाईट मागील १० वर्षांपासून बंद आहे. माजी आमदार रंजीत कांबळे यांनी यासाठी निधी दिला होता. काही महिनेच सुरू राहिल्यानंतर त्याचा टायमर बंद पडला. त्याच्या दुरुस्तीस लाखो रुपये खर्च झाले, मात्र ग्रामपंचायतीकडे देखभाल करण्याची क्षमता नाही. त्यामुळे हा खर्च राज्य सरकारने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र आमदार व पालकमंत्र्यांकडून याकडे दुर्लक्षच झालं आहे.


हिंदी अनुवाद

सेवाग्राम विकास योजना में 6 वर्षों से बंद पथदीप, लोगों का आक्रोश फूटा

वर्धा – सेवाग्राम विकास आराखड़ा के तहत पिछले छह सालों से सड़कों के डिवाइडर पर लगाए गए पथदीप आज तक शुरू नहीं हो पाए हैं। ये खंभे केवल नेताओं के पोस्टर और होर्डिंग्स लगाने के लिए उपयोग हो रहे हैं। इससे नाराज नागरिकों ने कहा, “बेशर्मी की भी हद होती है साहब!”

22 जुलाई को सेवाग्राम के चरखा सभागृह में मोतियाबिंद मुक्त जिला अभियान के तहत एक बड़ा शिविर आयोजित किया गया था। इस आयोजन और नेताओं के स्वागत हेतु लगे भव्य पोस्टर इन्हीं खंभों पर दिखाई दे रहे थे।

कांग्रेस शासनकाल में पूर्व पालकमंत्री राजेंद्र मूलक ने “गांधी फॉर टुमारो” नामक संकल्पना रखी थी, जिसमें सेवाग्राम आश्रम और उसके आसपास का विकास प्रस्तावित था। लेकिन सत्ता परिवर्तन के बाद भाजपा सरकार ने इस योजना का नाम बदलकर “सेवाग्राम विकास आराखड़ा” रखा और पूर्व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ने इस पर भरपूर निधि प्रदान की।

इस योजना में केवल सेवाग्राम ही नहीं, बल्कि पवनार और वरुड जैसे गांवों को भी शामिल किया गया। लेकिन कई कार्य फंड की कमी के कारण अधर में लटक गए। सेवाग्राम मेडिकल चौक का सौंदर्यीकरण अधूरा है और वहां अब घास उग आई है। पत्थर की दीवारों में दरारें तक पड़ गई हैं।

सेवाग्राम आश्रम से वर्धा गांधी प्रतिमा तक के मार्ग पर पथदीपों के लिए खंभे खड़े किए गए थे, जिससे रात में सड़कें रोशन होंगी, ऐसी नागरिकों को उम्मीद थी। लेकिन छह वर्षों से इन खंभों पर बस पोस्टर ही टंगे हैं, रोशनी नहीं आई।


दोनों पार्टियों ने किया उपेक्षा का काम

भाजपा शासन में सुधीर मुनगंटीवार ने निधि देकर कार्य की शुरुआत की, लेकिन महाविकास आघाड़ी सरकार में पालकमंत्री सुनील केदार ने सिर्फ बैठकें लेकर ठेकेदारों को तारीखें दीं। उन्हें कहा गया कि 2 अक्टूबर तक कार्य पूर्ण करें, लेकिन 2 अक्टूबर हर साल आता है और कार्य अब तक अधूरा है। पथदीप जलेंगे, यह आशा भी अधूरी रह गई।


सेवाग्राम चौक का हाईमास्ट लाइट 10 साल से बंद

पूर्व विधायक रंजीत कांबले द्वारा उपलब्ध कराए गए निधि से 10 साल पहले सेवाग्राम चौक में हाईमास्ट लाइट लगाई गई थी। कुछ महीनों तक वह चली, फिर उसका टाइमर खराब हो गया। उसकी मरम्मत पर लाखों खर्च हुए, लेकिन ग्रामपंचायत के पास मेंटेनेंस की क्षमता नहीं है। ग्रामपंचायत पदाधिकारियों का कहना है कि इसका खर्च राज्य सरकार उठाए। लेकिन न तो विधायक ध्यान दे रहे हैं और न ही पालकमंत्री। इन खंभों का उपयोग केवल नेताओं के प्रचार पोस्टर लगाने के लिए हो रहा है – बस इतना तय है!

– रविराज घुमे, वर्धा