गुरुमंदिरात 7 डिसेंबरपासून रंगणार प्रवचन व कीर्तन

0

श्रीगुरूचरित्र पारायण सप्‍ताहाला होणार प्रारंभ

नागपूर (Nagpur): समर्थ सद्गुरू श्री विष्णुदासस्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र, गुरुमंदिर जयप्रकाशनगर येथे शनिवार, 7 डिसेंबरपासून दत्‍तजयंती निमित्‍त श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होत असून त्‍यानिमित्‍त आयोजित प्रवचन व कीर्तनांचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.

याशिवाय, 7 व 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता ‘‘दैनंदिन जीवनात दासबोध’’ या विषयावर श्रीक्षेत्र खातगावचे मोहनबुवा रामदासी यांचे प्रवचन होणार असून, 9 व 10 डिसेंबर रोजी ‘‘श्री दत्तात्रेय यदु संवाद’’ या विषयावर वणीचे स्वानंद पुंड यांचे प्रवचन आणि 11 ते 13 डिसेंबर दरम्‍यान लखनऊचे सुप्रसिद्ध कीर्तनकार विजयकृष्ण भागवत यांचे कीर्तन होणार आहे.

कार्यक्रमांना उपस्थित राहून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र प्रमुख कल्याण पुराणिक यांनी केले आहे.