
नागपूर(Nagpur) : शहरातील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष मा. अनिल अहिरकर यांच्या हस्ते राजपालसिंग चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा परिधान करून पक्षात प्रवेश देण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना शहराध्यक्ष अनिल अहिरकर व शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले की राजपालसिंग चव्हाण हे सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात नवसंजीवनी मिळाली असून, येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पक्ष निश्चितच अधिक बळकट होईल.”
राजपालसिंग चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर भावना व्यक्त करताना सांगितले मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनतेच्या प्रश्नांवर ठोस आणि प्रामाणिक लढा देऊ शकतो. पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही जनतेशी जोडलेले राहून काम करणार आहोत.”
यावेळी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणक मुकेश रेवतकर, जानबा मस्के, संजय तिवारी, राजेश शुक्ला, भरत शर्मा, रिंकू मिश्रा, कार्तिक सिंग, ऋषी सिंग, रजत चव्हाण अनिल पौनिपगार, अर्चना गजबिये, संदीप सातपुते,
आदि पदाधिकारी व कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













