
गोंदिया – GONDIYA गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा कायम राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार Sharad Pawar गटाचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख (Senior NCP Leader Anil Deshmukh) यांनी केलाय. गोंदियाच्या दौऱ्यावर असलेल्या देशमुखांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.
यावेळी खासदार खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळे MP Khushal Bopche, NCP Vice President Bajrang Singh Parihar, former MLA Dinanath Padole यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. जनतेच्या मनात या सरकारप्रती प्रचंड आक्रोश असून तो २०२४ निवडणुकीत दिसून येईल, असा दावा करुन देशमुख म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धानाला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र या सरकारने हेक्टरी बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. धानाला बोनस जाहीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा न करता त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी यावेळी केली. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकारचे सर्व लक्ष याच गोष्टींकडे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, असेही ते म्हणाले.