

नाशिक (Nashik): भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे आज सायंकाळी साडेसहा वाजता नाशिक येथे निधन झाले. त्यांचे निधन राजकीय आणि सामाजिक वर्तुळाची मोठी हानी ठरली आहे.
मधुकर पिचड(Madhukar Pichad) यांचे पार्थिव उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी देवठाण येथे नेण्यात येणार आहे. अकोले येथील अकोले कॉलेज आणि पक्ष कार्यालयात त्यांचे अंतदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवले जाईल. यानंतर, पार्थिव पिचड महाविद्यालयात नागरिकांना श्रद्धांजलीसाठी ठेवले जाईल.
अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजुर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. दुपारनंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होईल.
“मधुकरराव पिचड यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेतले. त्यांच्या आठवणी कायम प्रेरणादायी राहतील.”
वैभव पिचड, माजी आमदार