सीपी अँड बेरार महाविद्यालयात ‘वित्‍तीय साक्षरता’वर सेमिनार संपन्‍न

0

सध्याच्या डिजिटल युगात विविध प्रकारच्या ॲपद्वारे होणारे पेमेंट्स, लुभावणारे कर्जाचे प्रमाण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध असणारी वित्तीय सेवा आणि विविध मार्गांनी होणारी वित्तीय फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांना जागरुक करण्याकरिता आणि त्यांना शिक्षित करण्याकरिता सीपी अँड बेरार महाविद्यालयात ‘वित्तीय साक्षरता’ विषयावर सेमिनार घेण्यात आला.

यामध्ये विद्यार्थ्यांना भारताचे आर्थिक धोरण, आरबीआय, सेबी यांचे कार्य, गुंतवणूक करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, डिजिटल मार्गाने होणारी फसवणूक कशी टाळावी या संदर्भात सेबीचे रिसोर्स पर्सन व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च डेव्हलपमेंट या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कृणाल पारेख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेमीनारच्‍या समन्वयक डॉ. मेधा कानेटकर (Medha kanetkar)  यांनी केले तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. चंद्रहार दीक्षित यांनी मानले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जितेंद्र महाजन होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व शंकांचे समाधान करून घेतले.