ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ तर्फे 11 मार्च रोजी परिसंवाद

0

जागतिक महिला दिनानिमित्‍त आयोजन

ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ हनुमान नगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्‍त सोमवार, 11 मार्च रोजी परिसंवाद आयोजित करण्‍यात आला आहे. दुपारी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, हनुमान नगर येथे होणा-या परिसंवादाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. कल्पना पांडे राहतील.

डॉ. क्षमा केदार, संध्या दंडे, माधुरी साकुळकर, मनीषा काशिकर, डॉ. राखी खेडीकर, अॅड. स्मिता देशपांडे, डॉ विजया मारोतकर, रेखा दंडिगे घिया, मोनिका वारोतकर या सर्व, कुटुंब, समाज आणि राष्ट्रजीवनात अमूल्य योगदान देणा-या महिलांचा परिसंवादात समावेश राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा सदावर्ती करतील. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग, कोषाध्यक्ष विनोद व्यवहारे तसेच, ज्येष्ठ नागरिक मंडळ हनुमान नगर चे अध्यक्ष रमेशचंद्र बागडदेव, सचिव मोहन झरकर, प्रकाश मिरकुटे, दिनेश देशमुख यांनी केले आहे.