स्‍व. ईश्‍वर चौधरी यांना स्‍वरसुमनांजली

0

नागपूर (Nagpur), 3 एप्रिल

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय, दी चिटणवीसपुरा सहकारी बँकेचे माजी स्व. ईश्वर चौधरी यांना स्‍वरांजली अर्पण करण्‍यात आली. हा कार्यक्रम राष्‍ट्रीय शिवाजी मंडळ व शहीद स्‍मारक समिती झेंडा चौके येथे पार पडला.

स्व. ईश्वर चौधरी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मित्रपरिवारातर्फे स्‍वराजली कार्यक्रमाचे आयोजान करण्‍यात आले होते. शहीद स्‍मारक समितीचे अध्यक्ष ॲड अनिरुद्ध धारकर यांनी ईश्वर चौधरी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. दी चिटणवीसपुरा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष यादवराव शिरपूरकर यांनी चौधरी यांचे संघटन कौशल्‍य किती दांडगे यावर विचार व्‍यक्‍त केले. याप्रसंगी अविनाश सोनुले व चमूने विविध गीते प्रस्‍तुत केले. या राष्‍ट्रीय शिवाजी मंडळ अध्यक्ष ओंकार राऊत, सचिव गणेश वांढरे, ईश्वर चौधरी यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.

शेषराव दुरुगकर यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी नानाभाऊ वडूळकर, कृष्णा लेदाडे, माधवराव भोंडगे, देविदास अवचट, शयाम कापसे, नितीन चौधरी, अॅड. अभय रणदिवे, दिलीप डोंगरे, गोविंद नागपूरे,सतीश जैस्वाल, माधव हिरुळकर, राजू रामटेके, राजू चांदेकर यांचे सहकार्य लाभले.