

एनव्हीसीसी तर्फे आयोजित ‘व्यापारी पोलीस संवाद’ या कार्यक्रमात डॉ सिंगल यांचे बीज भाषण
नागपूर :- पोलिस खात्याने समाजात बदल घडवून आणावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते, परंतु हेच लोक समाजातील शक्य ते सर्व कायदे मोडीत काढतात. जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण कोणतीही तक्रार न करता स्थानिक नियमांचे पालन करू लागतो. टेक नियम भारतात परत आल्यावर पाळत नाही. याचा अर्थ, शिस्त राखणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हे कोणत्याही बाह्य घटकांवर अवलंबून नाही, तर केवळ स्व-नियमनावर अवलंबून आहे. जर आपण स्वतःला आपल्या समाजातील नियम पाळण्याची सवय घातली तर एक दिवस आपण भारतातील सर्व शहरांमध्ये पूर्णपणे शिस्तबद्ध समाज अनुभवू असा आशावाद नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रविंदर सिंगल यांनी आपल्या बीज भाषणातून व्यक्त केला. नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) तर्फे राजवाडा पॅलेस, येथे नुकत्याच आयोजित ‘व्यापारी पोलीस संवाद’ प्रसंगी ते बोलत होते.
डॉ सिंगल यांनी ट्रॅफिक समस्येपासून सायबर गुन्हयांपर्यंतच्या मुद्द्यांवर समाजात विविध प्रकारची शिस्त राखण्याचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. डॉ सिंगल यांनी नियमितपणे हेल्मेट घालणे यासारख्या सोप्या उपायांची अंमलबजावणी करण्यावर भर त्यांनी भर दिला. भविष्यातील चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी लहानपणापासूनच मुलांमध्ये शिस्त लावण्याच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. फेरीवाल्यांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापलेल्या सीताबर्डी सारख्या भागात वर्तमान परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिस विभागाने केलेल्या अनेक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. नागपुरातील विविध शासकीय संस्थांकडून पायाभूत सुविधांच्या कामांची सद्यस्थिती लक्षात घेऊन , कंत्राटदारांना सूचना केल्याचे ते म्हणाले.याशिवाय वाहतूक व्यवस्थापन गांभीर्याने घेतले जात आहेया, असे देखील त्यांनी सांगितले.
डॉ सिंगल यांनी चेन स्नॅचिंग, सट्टेबाजी आणि भूमाफिया या सारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. ड्रग्ज जनजागृती आणि महिला सुरक्षेसाठी पोलिस विभागाच्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, संघटित राहण्याचे आणि सुसंवादी समाजाच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. प्रश्न-उत्तराच्या सत्रात त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे दिली. या सत्रादरम्यान पोलीस आयुक्त डॉ सिंगल यांचा एनव्हीसीसी कार्यकारी समितीच्या सदस्यांनी सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.
डॉ सिंगल यांच्या आगमनापूर्वी, एनव्हीसीसीचे अध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी उद्घाटनपर भाषण केले, एनव्हीसीसीच्या गेल्या आठ दशकांतील उपक्रमांची रूपरेषा त्यांनी सांगितली आणि व्यापारी समुदायाला तक्रारी दाखल करण्यात मदत करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये ‘व्यापारी मित्र’ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. सहसचिव आणि संयोजक राजवंतपाल सिंग तुली यांनी सीपी डॉ रविंदर सिंगल यांचा औपचारिक परिचय उपस्थितांसमोर केला. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अर्जुनदास आहुजा आणि सचिव सचिन पुण्यानी यांनी एनव्हीसीसीच्या वतीने डॉ सिंगल यांचे स्वागत केले.
नंतर हेडकॉन्स्टेबल (वाहतूक) अतुल आगरकर यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. 80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात त्यामुळे स्वयं-शिस्तीने नियम पाळा असे ते म्हणाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय भिसे यांनी सायबर सुरक्षा आणि फसवणूक याविषयी सविस्तर सादरीकरण केले. सायबर फसवणूक, ऑनलाइन घोटाळ्यांविरुद्ध जागरुक राहण्याची गरज त्यांनी विशद केली.
या कार्यक्रमाला एनव्हीसीसीचे उपाध्यक्ष फारुखभाई अकबानी, उपाध्यक्ष स्वप्नील अहिरकर, सहसचिव दीपक अग्रवाल, पीआरओ सीए हेमंत सारडा आणि कार्यक्रमाचे सहसंयोजक हुसेन अजानी यांच्यासह मोठ्या संख्येने एनव्हीसीसी सदस्य, व्यापारी समुदायाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनव्हीसीसी कार्यकारी मंडळाचे सदस्य सी ए जोतवानी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन पुन्यानी यांनी केले. गजानन महाजन, हरमनजीतसिंग बावेजा, राहुल जैन, सतीश मिराणी, मनुभाई सोनी, रामावतार अग्रवाल, अजय मदान, जयप्रकाश पारेख, अमित अग्रवाल, हरीश छाबरानी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.
या प्रश्नांवर झाला उहापोह : फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेला धोका, अतिक्रमण, उपद्रव, वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांवर सीताबर्डी व्यापारी असोसिएशन तर्फे आवाज उठविण्यात आला. त्यावर सीपींनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.फेरीवाल्यांच्या समस्यांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती पथकात फेरबदल करण्याची विनंती संघटनेने केली. याशिवाय वाहतूक कोंडी आणि रिंगरोडवर चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, ‘पण ठेल्यांवर ‘वर विकल्या जाणाऱ्या ड्रग्सचा मुद्दा देखील व्यापारी प्रतिनिधींनी नमूद केला. विदर्भ रुरल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधीने तेल चोरीचा मुद्दा मांडला आणि नागपूरच्या ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची विनंती केली.