स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर मार्गाचा नामकरण समारंभ 14 ऑक्‍टोबर रोजी

0

 

– कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी (Union Minister Hon. Mr. Nitin Gadkari)
– उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Hon. Shri. Devendra Fadnavis)यांचे हस्‍ते होणार उद्घाटन

विद्यार्थी – युवकांचे प्रेरणास्‍थान स्व. दत्ताजी डिडोळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या राष्‍ट्रव्‍यापी विद्यार्थी संघटनेच्या स्थापना काळातील अग्रणी होते. विद्यार्थ्‍यांच्‍या उत्‍कर्षासाठी आपले संपूर्ण आयुष्‍य समर्पित करणा-या दत्‍ताजी डिडोळकर यांनी नागपूर विद्यापीठाच्‍या कार्यकारिणीचे सदस्‍य या नात्‍याने शिक्षण क्षेत्रात उल्‍लेखनीय योगदान दिले. त्‍यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते झिरो माईलपर्यंत नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या मार्गाला स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांचे नाव देण्‍यात येणार आहे.

स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांची पुण्‍यतिथी 14 ऑक्‍टोबर रोजी असून या दिवसाचे औचित्‍य साधून नागपूर महानगरपालिकेच्‍यावतीने शनिवार, 14 ऑक्‍टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर मार्गाचा नामकरण समारंभ आयोज‍ित करण्‍यात आला आहे. झिरो माईल मेट्रो स्‍टेशनजवळ, सीताबर्डी येथे होणा-या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह आयोजन समितीचे अध्‍यक्ष केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी राहणार असून मार्गाचे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते होईल.

कार्यक्रमाला सर्व आमदार प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर अडबाले, डॉ. नितीन राऊत, कृष्‍णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे तसेच, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्‍त डॉ. अभिजीत चौधरी व स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह आयोजन सम‍ितीचे सचिव अजय संचेती यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे.

कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दी समारोह आयोजन समिती व समारोह समितीच्‍यावतीने (President Adv. Sunil Paldhikar) अध्‍यक्ष अॅड. सुनील पाळधीकर, उपाध्‍यक्ष आ. (Dr. Ramdas Ambatkar) डॉ. रामदास आंबटकर, (Secretary Dr. Muralidhar Chandekar)सचिव डॉ. मुरलीधर चांदेकर, (Vinay Mahurkar) विनय माहूरकर, (Jayant Pathak)जयंत पाठक, (Dr. Upendra Kothekar)डॉ. उपेंद्र कोठेकर, (Prof. Anil Sole) प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.

स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांचा परिचय :

(Dattaji Didolkar)दत्‍ताजी डिडोळकर यांचा जन्‍म बुलढाणा जिल्‍ह्यातील मलकापूर येथे 7 ऑगस्‍ट 1924 रोजी झाला, त्यांचे कुटुंब जळगाव जामोद तालुक्यातील डिडोळ येथील होते. नागपुरातील पटवर्धन हायस्‍कूल, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स येथून शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी सर्वप्रथम केरळ येथील कालिकत येथे आणि नंतर यावेळच्या दक्षिणेतील एकत्रित मद्रास प्रातांचे प्रांत प्रचारक म्‍हणून दायित्‍व सांभाळले. पुढे काही युवक मंडळीनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्‍थापना केली, त्यात दत्ताजी अग्रणी होते. १९४९ मध्ये विद्यार्थी परिषदेची विधिवत स्थापना झाली. कन्‍याकुमारी येथील स्‍वामी विवेकानंद शीला स्‍मारकाच्‍या संकल्पनेत त्‍यांचे महत्‍वाचे योगदान होते. त्यावेळी अमरावती, गोंडवाना आणि नागपूर विभागासाठी असलेल्या एकत्रित नागपूर विद्यापीठात त्यांनी सिनेट आणि व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केले. त्या काळात विद्यापीठात कार्यरत विविध विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाशी समन्वय ठेवून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. डिडोळकर यांचे 14 ऑक्‍टोबर 1990 साली नागपुरात निधन झाले.