


स्व. मीनाताई ठाकरे ( Meena Thackeray)स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान
अमरावती (Amravti), 11 ऑगस्ट
आपल्या कार्यकर्तृत्वाने महिला सक्षमीकरणाची मोहीम बळकट करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शिवसेना उबाठा गटाकडून भव्यदिव्य कार्यक्रमात स्वर्गीय माँ साहेब मीनाताई ठाकरे स्मृती स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.असंत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Former Guardian Minister Yashomati Thakur)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेनेच्या सुषमा अंधारे तसेच शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादीचे नेते व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार प्रदीप वडनेरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीरभाऊ सूर्यवंशी, शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख सागरताई पुरी, माजी आमदार धाने, प्रतिभा बोपशेट्टी, कांचन ठाकूर, जिल्हाप्रमुख श्याम – देशमुख, मनोज कडू, महानगरप्रमुख पराग गुडदे, ज्योती अवघड, वर्षा भोयर, मनीषाटेंबरे, प्रीतीबंड, लक्ष्मी शर्मा, राजश्री जटाळे, सौं मराठे, प्रशांत वानखडे, भारत चौधरी, राजेंद्र तायडे, ललित झंझाड, जयश्री कुहेकर अर्चना धामणे आदी उपस्थित होते.
या नारीशक्तीचा झाला सन्मान
या सोहळ्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्तीताई अर्जुन, प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका उज्वलाताई हावरे, पीडित महिलांसाठी झटणाऱ्या समाजसेविका, लेखक व रजियाताई सुलताना, वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत डॉ. रंजनाताई बनारसे, असंख्य निराधार वृद्धांचा सांभाळ करून त्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या सुख शांती वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती सुमनताई रेखाते, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनीताई निमकर आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दिशा संस्थेच्या संचालिका अॅड. ज्योतीताई खांडपासोळे यांचा स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृती स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानचिन्ह, पैठणी व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच पद्माताई घरडे, शीतल पुंड, ज्योतीताई कहाळे, अनुष्का बेलकर, शुभदा मेटकर यांचा देखील विशेष पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार कार्यक्रमाचे औचित्य साधून अमरावतीचे खासदार बळवंतभाऊ वानखडे, शिवसेना नेते व दक्षिण मुंबईचे खासदार अरविदजी सावंत, यवतमाळ – वाशिमचे खासदार संजयभाऊ देशमुख, वर्धेचे खासदार अमर भाऊ काळे या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.