स्व. लीलाताई फडणवीस स्मृती जोगवा/गोंधळ समूहगान स्पर्धा

0

नागपूर, 10 ऑक्‍टोबर

स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व बाल कला अकादमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांकरिता स्वर्गीय लीलाताई फडणवीस आंतरशालेय जोगवा/ गोंधळ समूहगान स्पर्धेचे आयोजन मंगळवार 17 ऑक्‍टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्‍यात आले आहे. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महाल येथे होणा-या या स्‍पर्धेत शिक्षकांनी सहभागी व्‍हावे व अधिक माहितीकरीता उत्कर्षा महाजन – 9422185013 यांच्‍याशी संपर्क साधावा. याशिवाय, पम्की आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्ग 1 ते 4 च्‍या विद्यार्थ्‍यांसाठी चित्र रंगवा स्पर्धा तर वर्ग 5 ते 10 च्‍या चित्रकला स्पर्धा घेण्‍यात येणार आहे. 29 ऑक्‍टोबर 2023 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेदरम्‍यान श्रीमती दादीबाई देशमुख मुलींची शाळा महाल, नागपूर येथे ही स्‍पर्धा होईल. अधिक माहिती करिता उर्वशी डावरे – 9579255965
व प्रिती नौकरकर – 8087378860 यांच्‍याशी संपर्क साधावा.