
(Amravti)अमरावती- बांगलादेशाने संत्र्यांवर प्रति किलो 88 रुपये आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. संत्र्यासाठी (Bangladesh)बांगलादेश मोठी बाजारपेठ असतांना सतत आयात शुल्क शेकडोपट वाढल्याने ना व्यापाऱ्याना संत्री बांगलादेशला पाठवणे परवडते, ना बांगलादेशला संत्री मागवणे परवडते.
त्यामुळे संत्र्याचे भाव पडले आहेत. राज्यात सर्वाधिक संत्र्यांचे उत्पादन विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्यासाठी मोर्शी, वरूड, चांदूरबाजार हा भाग प्रसिद्ध आहे.
मात्र, सध्या संत्र्याला भाव नसल्याने संत्रा उत्पादन शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी स्वतःच्या संरक्षणासाठी पुढे आले असून चांदूरबाजार तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी घोषणा देत अनोखे आंदोलन करत आहेत. शासनाने आयात निर्यात शुल्कावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.