स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर जन्‍मशताब्‍दीनिमित्‍त आढावा बैठक

0

नागपूर, 23 जुलै
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्‍थापक सदस्‍य, स्‍वामी विवेकानंद शिला स्‍मारक कन्‍याकुमारीचे आधारस्‍तंभ, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प्रचारक व युवकांचे प्रेरणास्‍थान स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे 7 ऑगस्‍ट 2023 ते 7 ऑगस्‍ट 2024 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्‍हणून साजरे केले जाणार आहे. त्‍यानिमित्‍त वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्‍यात आली आहे.
जन्‍मशताब्‍दी वर्षाचा भव्‍य उद्घाटन सोहळा येत्‍या, 6 ऑगस्ट 2023 रोजी होणार असून या कार्यक्रमाला विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यातून जुने नवीन कार्यकर्ते उपस्‍थ‍ित राहणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या तयारीचा आढावा घेण्‍याकरीता रविवारी नागपुरातील सर्व कार्यकर्त्यांची आढावा बैठक सेवासदन संस्थेतील जठार सभागृहात रविवारी पार पडली. संयोजन समितीचे सदस्‍य डॉ. रामदास आंबटकर यांनी या बैठकीत प्रास्ताविक करून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संयोजक मुरलीधर चांदेकर, अनिल सांबरे, बापू भागवत, सुनील पाळधीकर यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रत्येक व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या दृष्टीने त्या त्या व्यवस्थेतील कार्यकर्त्यांच्या बैठकीदेखील आयोजित करण्यात आल्या. बैठकीच्या समारोपीय सत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने यांनी मार्गदर्शन केले. अजय चव्हाण, पद्मा चांदेकर यांनी व्यवस्थेच्या तयारीची माहिती दिली.