

नागपूर-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे -Congress National President Mallikarjun Kharge यांचे पूत्र प्रियांक खर्गे यांनी स्वा. सावरकरांबद्धल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून शुक्रवारी राज्यभर भाजपच्या वतीने निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील भाजपच्या आमदारांनी जोरदार आंदोलन करुन काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचा धिक्कार करतानाच भाजपने या मुद्यावर आता उद्ध ठाकरे यांना देखील लक्ष्य केले असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. (Winter Assembly Session)
स्वा. सावरकरांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करून त्यांचा फोटो कर्नाटक विधानसभेतून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या प्रियांक खर्गे यांच्या वक्त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भाजपने काँग्रेस व ठाकरे गटाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. नागपुरातील भाजपने निदर्शने आयोजित केली आहेत. तर नागपुरात सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत असून या मुद्यावर ठाकरे गट अडचणीत आला आहे. भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज निदर्शने केली. भाजपचे आमदार निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत होते. ‘राहुल गांधी हाय हाय’, ‘मल्लिकार्जून खर्गे हाय हाय’, ‘उद्धव ठाकरे जवाब दो जवाब दो’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन असले तरी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणणारा ठाकरे गट या आंदोलनाचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता ठाकरे गट या मुद्यावर काय भूमिका घेतले, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.