

कलाशिक्षक परमानंद तिरानिक कला पुरस्काराने सन्मानित
आदिवासी लोकांची जगणेच कलात्मक असून त्यांची जीवनदृष्टी ,कलासृष्टी वेगळी नाही. आदिवासी समूह अंतर्गत घडणाऱ्या शुद्ध व्यवहाराचा विचार करून चित्रपट नाट्यनिर्मिती व्हावी हाच मुख्य उद्देश कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस बहुरंग तर्फे दिल्या जाणाऱ्या कलावंत कला गौरव तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिमत्त्वाची निवड करण्यात आली आहे. असे प्रतिपादन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले या अठराव्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
या चित्रपट महोत्सव डॉ. मोरे यांच्या हस्ते आचार्य परमानंद तिरानिक कलाशिक्षक यांना ‘आदिवासी कलाकार पुरस्कार’ देऊन सहपत्निक रुक्मिणी तिरानिक चा सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते .सत्काराला उत्तर देताना परमानंद तिरानिक म्हणाले रसिक प्रेक्षकांशिवाय आम्हा कलाकारांचा प्रवास अपूर्ण आहे. कला गौरव पुरस्काराच्या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात उत्साहाने प्रेरणा घेऊन मिळालेल्या पुरस्काराचे मोल मोठे आहे. पंडित जवारलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बहुरंग पुण्याचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, डॉ.रामकृष्ण पेठेकर ,आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक ग.श. पंडित उपस्थित होते .पुरस्कार समारंभनिमित्त पहिल्या दिवशी देशी,विदेशी माहितीपट व लघु चित्रपट दाखवण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी भगवान बिरसा मुंडा या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप झाला.