पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर शहराध्यक्षपदी नरेंद्र वैरागडे यांची निवड

0

नागपूर(Nagpur):- पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर शहराध्यक्षपदी नरेंद्र वैरागडे(Narendra Vairagade) यांची नुकतीच निवड करण्यात आली. नरेंद्र वैरागडे हे मागील 30 वर्षापासून वृत्तपत्र सृष्टी काम करीत आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रात काम केले आहे.त्यानी केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वैरागडे सद्या वृत्तनामा न्युज 24 या न्युज चॅनल चे न्युज डायरेक्टर प्रहार दैनिक चे नागपूर ब्युरो चीफ म्हणून काम करीत आहे

पुरोगामी पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष जयंत साठे यांनी व महाराष्ट्र राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांच्या सूचने नुसार प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव,राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.या सबंधी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांना नियुक्तीची प्रतिलिपी पाठविण्यात आली असून, नरेंद्र वैरागडे यांच्या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणी,विदर्भ कार्यकारणी,विविध जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष,पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा ऍड.योगिता रायपूरे, रणजीत सिंह चंदेल, नाना मुंदे, संजय भगत, रमेश तांबे, छोटू राऊत, संजय तेलंग, बंडू कांबळे, दिगंबर पुनवटकर, प्रलय तेलतुंबडे, , राजेंद्र बागडे, गौतम तोतडे, कवडूजी नगराळे, विनोद आदे, कास्ट्राईबचे प्रदेशाध्यक्ष अरुण गाडे, राजेश कांबळे, विवेक तेलंग, सुभाष आडे, घनश्याम पाटील, श्रीकृष्ण सोनारखन, रमेश तेलंग, नरेश तेलंग, प्रमोद करमणकर, मोहन भवरे, रूप कुमार तेलंग, सतिश राणा, प्रा. माधवराव सरकुंडे, मिलिंद किर्ती यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.