भारतीयांना धमकावणाऱ्या पन्नूवर जप्तीची कारवाई

0

चंडीगड-कॅनडात भारतीयांना धमकावणारा खालिस्तान समर्थक दहशतवादी सिख फॉर जस्टिस संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याच्या चंडिगडमधील घरावर छापा घालून एनआयए ने जप्तीची कारवाई केली आहे. पन्नू हा सध्या कॅनडात असून तेथील सरकारच्या जोरावर भारतीयांना धमकावत असल्याचे अनेक व्हिडिओ पुढे आले आहेत. कॅनडा सरकार पन्नूवर कारवाई करण्यास तयार नसले तरी भारतात एनआयए ने पन्नूविरुद्ध फास आवळणे सुरु केले आहे. शनिवारी सकाळीच एनआयएने चंदीगडमधील गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरावर छापा टाकला. चंदीगडच्या सेक्टर १५ मध्ये पन्नूचे घर आहे. या घरावर एनआयएने जप्तीची नोटीसही लावली आहे. यासाठी एनआयएने विशेष न्यायालयाची परवानगी घेऊन ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.