

15 उमेदवारांचा समावेश; गोटे, राजू तडवी, जामसुतकर यांना संधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चोपड्यातून राजू तडवी यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेसाठी महत्त्वाचा मनला जाणारा भायखळा मतदारसंघात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेची उमदेवारांची यादी देखील वाचा…
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा – राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
बुलडाणा- जयश्री शेळके,
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली – योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर.
उद्धव ठाकरे 90 जागांवर उमेदवार देणार
उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आता आणखी 15 उमेदवार उभे करून पक्षाने एकूण 80 जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आधी 85+85+85 असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नंतर हा 90+90+90 करण्यात आला असून, त्यानुसार उद्धव ठाकरे लवकरच आणखी जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करू शकतात.
विधानसभा निवडणूक अशी
20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर मतदान आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केले जातील. सध्या महायुतीची (म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी) सत्ता आहे. तर यावेळी महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) देखील पुन्हा सत्तेची कमान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता जनता यावेळी कोणाचे सरकारला निवडून देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.