

नागपूर (Nagpur)– आज आणि उद्या दोन दिवस विदर्भात माझा दौरा आहे.आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजे, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत आम्ही आलो आहोत असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सध्याचे वातावरण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जो संकल्प केला आहे 45 प्लस तो संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करू असं वातावरण महाराष्ट्रात आहे. जागा वाटप दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. मनसेशी युती संदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. त्यावर तेच लोक निर्णय सांगू शकतात.
आता जे काही उमेदवार जाहीर झाले, आणि उर्वरित दोन दिवसांत होणार आहेत त्याचा रिव्ह्यू घेतला तर महायुतीचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात चांगले आहे. जागा अदला बदल होणार का, असे छेडले असता तुमच्या मनातील सगळ्या समस्यांचं दोन दिवसांत निरसन होईल सर्व 48 च्या 48 जागा जाहीर होतील.सिंधुदुर्ग बाबत अद्याप कुठलीही चर्चा किंवा फायनल झालेले नाही. ती जागा शिवसेनेची आहे आणि ती जागा आमच्या वाटेला आली तर दोन अडीच लाखाने आम्ही जिंकू महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल असेही उदय सामंत म्हणाले.