‘सायन्स ऑफ हीलिंग’ शिबिर आता नागपूरमध्ये

0

अंतर योग या फोर्ट, मुंबई येथील आध्यात्मिक संस्थेतर्फे, नागपूरमध्ये येत्या १९-२० ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय ‘सायन्स ऑफ हीलिंग’ शिबिर आयोजित केले जात आहे. या शिबिरात अंतर योग संस्थेचे संस्थापक, जीवनमुक्त सद्‌गुरू आचार्य उपेंद्रजी शिबिरार्थीना शक्तिपात दीक्षा देतात आणि त्यांच्याकडून स्वतःमधील रोगनिवारण शक्ती जागृत करणारी शक्तिशाली शिवसाधना व चक्रसाधना करवून घेतात. परिणामी साधक फक्त २ दिवसात ‘ह्याची देही ह्याची डोळा’ आपल्यामध्ये घडलेले सकारात्मक बदल अनुभवतात आणि शिबिर संपताना त्यांना आलेली प्रचिती आपणहून सांगतात.

शिबिराच्या आधी आणि नंतर सर्व शिबिरार्थीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात आणि त्या अहवालातून जवळपास सर्वांच्याच स्वास्थ्यामध्ये निव्वळ २ दिवसात लक्षणीय सुधारणा झालेली दिसून येते. असा तात्काळ दाखला अन्यत्र कुठेही दिसत नाही. या शिबिराचे अ‌द्भुत अनुभव पहायला तिन्ही प्रकारच्या वैद्यकीय शाखांतील (अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी) तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित असते.

या आधी मुंबई, पनवेल, नाशिक या ठिकाणी झालेल्या सदर शिबिरांत आचार्यांच्या योगसिध्दीने मधुमेह, उच्च रक्तदाब, फ्रोझन ✓ शोल्डर, पॅरालिसिस, मणक्यांचे विकार, श्वसनाचे त्रास, तणाव यांसारख्या अनेक आजारांबाबतीत लोकांनी आश्चर्यकारक अनुभव घेतले आहेत.

– ईश्वर अनुग्रहित सद्‌गुरु आचार्य उपेंद्रजी २००५ पासून, भारताला एक बलशाली, निरोगी व चारित्र्यसंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी झटत आहेत. त्यांनी या दुर्लभ आणि दिव्य साधनेची निर्मिती, त्यांच्या अनेक जन्माच्या तपसाधनेद्वारे विश्वकल्याणासाठी केली आहे. यातूनच या ‘सायन्स ऑफ हीलींग ‘शिबिराची आखणी करण्यात आली आहे.

आचार्यजींच्या मते, ‘आजारांचे मूळ केवळ विज्ञानाने १००% नाहीसे होऊ शकत नाही. विज्ञानासोबत, शास्त्रसंमत ‘मंत्रसाधना आणि योगिक उपचारपद्धतीची जोड असलेले हे दुर्लभ तंत्र हा शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचा रामबाण उपाय आहे.’ शिबिरातील ज्ञानसत्राद्वारे आजारांचे मूळ कारण आणि कायमस्वरूपी उपचार समजण्यास साधकांना मदत होते. तसेच अनेक आजार कोणत्याही औषधाने बरे का होत नाहीत याचेही उत्तर मिळते.

अंतर योग संस्थेची प्रसार माध्यमांना नम्र विनंती आहे की, त्यांनी या अत्यंत दुर्लभ शिबिराची पूर्व सूचना नागपूरकरांना आवर्जून द्यावी, ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल. तसेच ही अपूर्व योगिक चिकित्सा पद्धती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी या शिबिराला आपलीही उपस्थिती अवश्य नोंदवावी

पत्ता : रॉयल पराते सभागृह, ३रा मजला, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, खामला रोड, नागपूर तारीख: १९ आणि २० ऑक्टोबर