तोवर आदिवासींच्या योजना धनगरांना लागू होणार-मुख्यमंत्री

0

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर आज बैठक पार पडली. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत, त्या लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Dhangar Reservation Issue) यापूर्वी आरक्षणाबाबत झालेल्या विविध निर्णयांची कार्यपद्धती पाहण्याचा निर्णय या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणात राज्य सरकारकडून सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये धनगर समाजाचा एक प्रतिनिधी देखील असेल. तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस केसेस मागे घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. आरक्षण देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये, त्यांचे आरक्षण कमी होऊ नये, यावरही चर्चेदरम्यान निर्णय घेण्यात आला. सध्या आदिवासी समाजाला जे लाभ मिळतात ते प्रभावीपणानं धनगर समाजाला मिळाले पाहिजेत, याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.