
(Nagpur)नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)(यांच्या कार्यालयात धमकीचा फोन करुन 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारी (Shakir Pujari)यांनी आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल (Criminal Jayesh Pujari) केलीय. नागपूर कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा त्याने केलाय. जयेश हा मागील दीड महिन्यांपासून नागपूर कारागृहात वास्तव्याला आहे. त्याला नागपूर कारागृहात सुविधा मिळत नसल्याने त्याने ही मागणी केली असावी, असा पोलिसांचा दावा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने मागच्याच आठवड्यात जयेश उर्फ शकिरची चौकशी केली होती. जयेश हा (Belgaon Jail)बेळगाव कारागृहात कैद असलेल्या (Akbar Pasha, leader of terrorist organizations)दहशतवादी संघटनांचे म्होरके अकबर पाशा, कॅप्टन नसीर आणि फहद कोया रशीद मालाबारी (Captain Naseer and Fahad Koya Rashid Malabari)यांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात तो धमकीचे फोन करीत होता. त्याचे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, पुजारीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रतिवादींना नोटीसा बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.