सावित्री प्रबोधिनी मंच तर्फे निराधार वृद्धांना ब्लॅंकेट वाटप

0
सावित्री प्रबोधिनी मंच तर्फे निराधार वृद्धांना ब्लॅंकेट वाटप
सावित्री प्रबोधिनी मंच तर्फे निराधार वृद्धांना ब्लॅंकेट वाटप

सावित्री प्रबोधिनी मंचच्या वतीने थंडीच्या दिवसात निराधार वृद्ध भिक्षेकरी,उघड्यावर निवारा करणारे, बे-सहारा लोकांना थंडी पासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी उनी कपडे ब्लॅंकेट वितरीत करण्यात येते यावर्षी नुकतेच उत्तर नागपूर येथील नालंदा वृद्धाश्रम राणी दुर्गावती नगर व बौध्दिवृक्ष वृध्दाश्रम धम्मदिप नगर येथील निराधार वृद्धांना ५० ब्लॅंकेट वितरीत करण्यात आले हे वृध्दाश्रम लोकवर्गणीतून चालत असल्याने पुरेषा सोई उपलब्ध नव्हत्या मोठ्या कष्टाने दोन्ही वृध्दाश्रमाचे संचालक या वृध्दांचा सांभाळ करत आहे त्यांना मदतीची नितांत गरज आहे सावित्री प्रबोधिनी मंच च्या महिला ह्या गृहिणी असुन स्वखर्चातून अनेक वर्षांपासून गोरगरिबांना, निराधारांना मदत करतात,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात, कष्टकरी महिलांना साड्यांचे वितरण करतात या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सौ.पूजा भस्मे, यांच्या मार्गदर्शनात राजेश्री बागडे, किशोरी वैरागडे, बिंदू वासनिक, निलिमा चहारे, कल्पना गायकवाड, रोशनी वैरागडे,मेघा नारनवरे, छाया पाटील, आशा गजभिये,संध्या बोरकर वंदना काटकर मंदा गायकवाड,संगीता वासनीक, पुष्पाताई शेंडे, विद्या मून माधुरी पाटील,दिपा थुलकर, प्रियांका सातकर इत्यादी सहभागी होऊन सहकार्य केले