SCGT(Saturday Club Global Trust)नागपूर चॅप्टरच्या सचिव पदी अमित बोरकर यांची नियुक्ती

0

नागपूर (Nagpur), ८ फेब्रुवारी: सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या नागपूर चॅप्टरच्या सचिवपदी आयसीटी मीडिया प्रा. लि.चे सहसंचालक अमित बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी हॉटेल नॉर्थ विव्ह येथे झालेल्या नियमित बैठकीत नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन, माजी सचिव अश्विनी ऋषी आणि कोषाध्यक्ष शरद अरसडे तसेच अन्य सदस्यांच्या उपस्थितीत स्वीकारला.

शनिवारी स्वीकारला पदभार

अमित बोरकर हे उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असून, त्यांना व्यावसायिक नेटवर्किंग, स्टार्टअप्स आणि उद्योगवाढीचा व्यापक अनुभव आहे. ट्रस्टच्या नागपूर चॅप्टरच्या सचिवपदी त्यांची निवड झाल्याने स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ असून, महाराष्ट्रीयन व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण करणे, कौशल्य विकास आणि व्यावसायिक सहकार्य वाढवणे हे उद्दीष्ट असल्याचे मत नवनियुक्त सचिव अमित बोरकर यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अमित बोरकर यांनी क्लबचे ट्रस्टी तसेच डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुभाष गोरे तसेच नागपूर चॅप्टरची सीएसटी टीम यांचे आभार मानले.