सोमलवारचा संस्थापक दिन समारोह 26 डिसेंबर रोजी

0

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती

सोमलवार शिक्षण संस्‍थेचा 70 वा संस्‍थापक दिन समारोह गुरुवार, 26 डिसेंबर 2024 साजरा केला जात असून या कार्यक्रमाला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Sarsangchalak Dr. Mohanji Bhagwat) यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. सोमलवार हायस्‍कूल व कनिष्‍ठ महाविद्यालय, निकालस शाखेचे प्रांगण, खामला येथे सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल.

सोमलवार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. जी. के. उर्फ अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिप्रीत्‍यर्थ व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले असून डॉ. मोहनजी भागवत उपस्‍थ‍ितांना संबोधित करतील. याच कार्यक्रमात ‘अस्‍मायर’ या प्रज्ञा शोध परीक्षेचे बक्षिस वितरणदेखील होणार आहे. या स्‍पर्धेत नागपुरातील 79 नामांकित शाळांमधील 24000 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमास मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन सोमलवार शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष अॅड. एम. एल. सोमलवार यांनी केले आहे.