असं काय घडलं, सरपंचांनी थेट ग्रामपंचायतीला ठोकल कुलूप

0

Sarpanch-locks-gram-panchayat-s-setu-kendra अमरावती (Amravti) 27 जुलै मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी ग्रामपंचायत सरपंच यांनी अचानक ग्रामपंचायतच्या सेतू केंद्राच्या कक्षाच्या कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली आहे. सेतू केंद्र (setu kendra)चालकाने गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, तर सरपंचांनी लाडकी बहीण व अन्य योजनांचे फार्म भरण्यासाठी गावातील लोकांनकडून अवाजवी पैसे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.नागरीकांकडून तक्रार आल्याने त्यावर आम्ही गटविकास अधिकारी, तहसीलदार मोर्शी यांच्याकडे तक्रार केली असून पत्र देऊन जनतेची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी कुलुप लावण्याचे कार्य केले असून नागरीकांची गैरसोय पाहता दुसऱ्या सेतू संचालकाची मागणी सुद्धा प्रशासनाकडे केली आहे.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)

ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या वतीने आपले सहकार सेवा केंद्र (सेतू) जनतेच्या सुवेधिसाठीव व विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लाख रुपयांचा निधी खर्च करून गावातच तहसीलचे दाखले मिळण्याची उत्तम सोय शासनाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नुकतेच लाडकी बहीण योजना व विविध योजनांचे आवेदन ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय व जबाबदारी सुध्दा शासनाच्या वतीने आपले सहकार सेवा केंद्र संचालक यांच्यांकडे सोपविण्यात आली आहे.

राजुरवाडी येथील आपले सहकार सेवा केंद्राच्या कक्षाला ग्रामपंचायत सरपंच पल्लवी अभिजित मानकर यांनी कुलूप ठोकले.यासंदर्भात सरपंच पल्लवी मानकर म्हणाल्या की, आपले सेवा केंद्र संचालक हा लाडकी बहीण योजना तसेच अन्य योजनांचे फार्म भरण्यासाठी महिलांसह इतर नागरीकांकडून शंभर दोनशे रुपये अतिरिक्त प्रतेक फॉर्मचे घेत असून नागरिकांनी याबाबत माझ्याकडे तक्रार केली. यावर गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

त्यावर चौकशी सुरू आहे. यामधे अनेक महिलांनी बयान नोंदवीले असून सर्व सामान्य जनतेची आर्थिक लूट थांबविण्यासाठी मी प्रशासनाकडे दुसरे सेतू केंद्र संचालकाची मागणी केली आहे. दुसरा व्यक्ती येईपर्यंत सेतू केंद्राला कुलूप ठोकले. जेणेकरून मंगेश राऊत यांनी नागरीकांची आर्थिक पिळवणूक करु नये.