Bus accident at Saptshringi सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटीतर्फे दहा लाख

0

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री Treatment of the injured at government expense: Chief Minister 

मुंबई Mumbai  12 जुलै  : नाशिकमधील कळवण (Nashik) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.Saptshringi ST bus accident 10 lakhs woman died heirs खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.The bus of Khamgaon Agar left from Saptshringi Fort this morning in the direction of Khamgaon. At that time, the bus fell directly into the 400 feet valley from the Ganapati stage in the ghat. Preliminary information is that there are 22 passengers in the bus. Relief work has started from the local residents of the fort and government agencies. 

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.