संस्कृत बाल नाट्य स्पर्धा अंतिम फेरीला प्रारंभ

0

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक आणि बाल रंगभूमी परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत बाल नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरेश भट सभागृहात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलसचिव तथा संचालक विस्तार सेवा मंडळ आचार्य कृष्णकुमार पांडे, बाल रंगभूमी परिषद अध्यक्ष आभा मेघे, संस्कृतज्ञ आचार्य चंद्रगुप्त वर्णेकर, लीना रस्तोगी, परीक्षक गण डॉ विभा क्षीरसागर, रमेश लखमापूरे, प्रा पराग जोशी यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने प्रारंभ झाला.

त्यानंतर स्वामीनारायण वर्धमान नगर, सरस्वती विद्यालय, एस ओ एस अत्रे ले आऊट, रिलायन्स, भवंस कोराडी, भारती कृष्ण विद्या विहार, भवंस चीचभवन, भवंस आष्टी, टीप टॉप कॉन्व्हेन्ट, संस्कृत प्रचारिणी सभा यांनी एकापेक्षा एक सरस बाल नाट्य सादर केली.

शुक्रवार दिनांक २७ ला उर्वरित नाटक झाल्यानंतर लगेच सायं ५.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी कुलगुरू संस्कृत विश्वविद्यालय रामटेक चे कुलगुरू आचार्य हरेराम त्रिपाठी, कुलसचिव कृष्णकुमार पांडे, श्रीपाद अपराजित, नरेश गडेकर, आभा मेघे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
याप्रसंगी नाट्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक संजय रहाटे, प्रशांत मंगदे, विलास कुबडे, अनिल देव, रोशन नंदवंशी, योगेश राऊत, नितीन पात्रिकर, अमोल निंबरते यांनी केले आहे.