मुंबई – ईडीची मुंबईमध्ये छापेमारी सुरू आहे.कुणीतरी एक विशिष्ट व्यक्तींबाबत तक्रार करतो. विशिष्ट व्यक्तिंविरुद्ध आणि शिवसेनेवर आरोप करायचे, त्याला राजकीय सुडाची कारवाई म्हणतात. ही राजकीय सुडाची कारवाई सुरू असेल, तर त्या कारवाईलाला आम्ही सगळे हिमतीने सामोरे जायला तयार आहोत असे खा संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले,आमच्यातील अनेक लोक मी असेल, अनिल परब, रवींद्र वायकर असतील याचा त्रास आम्हाला होत आहे. भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात. एकतर्फी कारवाया कशा सुरू आहेत? माझ्याकडे पत्र आहे 20 जूनला काल देखील मी ईडी मध्ये तक्रार केलेली आहे.मिळालेल्या पत्रानुसार त्यांनी तक्रार फाईल करून घेतली आहे. त्याची त्यांनी मला पोच पावती दिलेली आहे.मी वारंवार सांगत आहे दादा भुसे यांची जवळजवळ 178 कोटींचे मनी लॉन्ड्री आहे. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून पैशाचा अपहार केला आणि पैसे परदेशात गेले त्याची देखील रीतसर तक्रार मी ईडीकडे फाईल केली आहे. दुसरे प्रकरण राहुल कुल यांची 500 कोटी मनी लॉन्ड्री आहे. वारंवार सांगून देखील यांच्यावरती धाडी पडत नाहीत.अब्दुल सत्तार यांची देखील मी ईडी कडे तक्रार करणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या कारखान्याचा विषय आहे. तुम्ही आमच्याचं लोकांमध्ये धाडी का घालत आहेत.इतकी संकटे येऊन सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना झेप घेते आहे. त्यांना रोखण्यासाठी हे होत आहे का? ठीक आहे तुम्ही आमचे बळी घ्या, तुम्ही आमच्यावर गोळ्या चालवा, बंदूका रोखा काहीही करा ही घोडदौड सुरूच राहील असा इशारा राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला