
आगंतुकांना भाजपाने पक्षात घेतले आघाडीत आणले डोक्यावर बसविले महत्व वाढविले त्यातून विशेषतः मूळ संघ स्वयंसेवक आणि भाजपा कार्यकर्ते नेते दुर्लक्षित झाल्याने ते आधी चिडले त्यातले काही रडले काही भांडले काही दूर झाले अनेक अलिप्त राहिले काही रुसले फुगले काही रस्त्यावर आले काही घरात बसून गम्मत बघत राहिले त्यातून लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान एरवी हिरिरीने भाग घेणारे अभ्यासू आणि मेहनती स्वयंसेवक व कार्यकर्ते प्रचार कार्यात मोहिमेत रस्त्यावर उतरलेच नाहीत नेहमीप्रमाणे घरोघरी जाणूनबुजून फिरले नाहीत फिरकले नाहीत त्यामुळे जे घडायचे तेच नेमके घडले, लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला त्यांचे ओरिजनल कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवक प्रचारात न उतरल्याने फार मोठा फटका बसला, राज्यातून भाजपाला केंद्रात सत्ता मिळविताना मोठी मदत झाली नाही जी बाब प्रकर्षाने देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीची फार मोठी पीछेहाट महाराष्ट्रात झाली, आता देवेंद्र फडणवीसांचा एक फार मोठा गुण कोणता ते विशद करतो.
फडणवीसांचा अत्यंत चांगला गुण असा कि जर एखाद्याने त्यांची होणारी चूक किंवा चुका लक्षात आणून दिल्या तर ते त्यावर तातडीने विचार करतात आणि पुन्हा अशा चुका होणार नाहीत त्याची काळजी घेतात आणि हि ज्या ज्या नेत्यांची म्हणजे चुका सुधारण्याची अंगभूत वृत्ती असते असे नेते कधी ते नक्की पडतात झडतात पण पुन्हा पूर्वीसारखे उभे राहतात पुन्हा यशस्वी होतात. जर अमुक एखादी होणारी गंभीर चूक तुम्ही फडणवीसांच्या लक्षात आणून दिली तर ते तुमच्याविषयी मनात राग द्वेष न ठेवता उलट हि व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करणारी आहे त्यांच्या ते लक्षात येते आणि ते तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने घट्ट बिलगून मोकळे होतात.
संघ आणि भाजपा मंडळींकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी हवा तसा प्रचार कार्यात विरोध केला नाही पण भाग देखील घेतला नाही हे ज्याक्षणी फडणवीसांच्या लक्षात आले किंवा आणून दिल्या गेले त्यानंतर येणाऱ्या विधान सभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हि नाराजी आधी दूर केली आणि आज जेव्हा मी खेड्यापाड्यातून गावपातळीवर राज्यात सर्वत्र फिरतो आहे माझ्या ते लक्षात आले आहे कि प्रत्येक कानाकोपऱ्यात या दिवसात संघ स्वयंसेवक आणि मूळ भाजपा नेते व कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान कसे होईल आणि प्रत्येक मतदार मतदानासाठी कसा बाहेर पडेल त्यावर जी मेहनत हे सारे घेताहेत त्याला तोड नाही, या कट्टर संघ आणि भाजपावाल्यांना ना पैसे हवे असतात ना कोणती सेवा त्यांना हवी असते, केवळ प्रेमाचा आणि आदराचा हात तेवढा खांद्यावर त्यांना पुरेसा असतो.
निवडणुकीतले नकारात्मक वातावरण पूर्णतः बदलण्याची मोठी शक्ती या देशभक्त स्वयंसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दडलेली जोपासलेली असते त्यातूनच तुम्हाला अगदी शंभर टक्के यश यावेळी महायुतीच्या बाजूने चालून आले हे दिसून येईल. दर क्षणी यादिवसात संघ स्वययंसेवकांचे प्रचार नियोजन बघून मी थक्क झालो….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी














