‘संध्याछाया’चा प्रयोग 16 रोजी

0

नागपूर (nagpur), 14 ऑक्टोबर
विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित, मानिनी बहुउद्देशीय संस्थेद्वारा निर्मित दोन अंकी नाटक ‘संध्याछाया’ची प्रस्तुती बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक, नाट्य लेखक, जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे नाटक सादर करण्यात येत आहे.

लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता होणार्‍या या नाटकाचे दिग्दर्शक रमेश लखमापुरे आहेत. नाटकात प्रफुल्ल माटेगावकर, डॉ. दीपलक्ष्मी भट, प्रज्वल भोयर, सत्यम निंबुळकर, तन्मय गंधे, वरुणराज नागूलवार, स्वप्निल भोंगाडे, उमा पाठक या कलाकारांच्या भूमिका आहेत.

नेपथ्य स्वप्निल बोहटे, संगीत कबीर लखमापुरे आणि विनय मोडक यांचे, रंगभूषा लालजी श्रीवास, प्रकाश योजना रमेश लखमापुरे आणि निर्मिती प्रमुख अपर्णा लखमापुरे आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.