संदीप जोशी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष

0

६८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच नागपूरला मान

नागपूर, (Nagpur) : नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, माजी महापौर व विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी (Sandeep Joshi) यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन (MSBA) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेच्या 68 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नागपूरच्या प्रतिनिधीची अध्यक्षपदी निवड झाली आहे. नागपूरसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.

संपूर्ण राज्यभरातील 31 जिल्हा बास्केटबॉल संघटनांच्या उपस्थितीत 2025-29 या कार्यकाळासाठी एमएसबीएची निवडणूक नुकतीच पार पडली. ॲड. अभिषेक सालियन हे निवडणूक निर्णय अधिकारी होते, तर बीएफआयचे शक्ती सिंह गोहिल आणि  महाराष्ट्र (Maharastra) ऑलिम्पिक संघटनेचे प्रदीप गंधे हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते

या निवडणुकीत नागपूरचे आणखी एक यश म्हणजे नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोशिएशनचे सचिव भावेश कुचनवार यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. मुंबईचे गोविंद कृष्णन मुथुकुमार हे सचिव आणि इब्राहीम लकडवाला हे कोषाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.

यासोबतच, विक्रांत पाटील, एस. रामकृष्णन आणि एम. वेंकटेश यांचीसुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून, पुण्याचे ललित नहाटा आणि अमरावतीचे जयंत देशमुख हे सहसचिव झाले आहेत. श्रीनिवास सापे, मनोज रेड्डी, शशिकांत नांदगावकर आणि अश्विन चंदेल हे कार्यकारिणी सदस्य आहेत. रत्नागिरी, नांदेड, जळगाव व बीड जिल्ह्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.

विशेष म्हणजे, ही निवडणूक महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोशिएशन आणि बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातील गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेल्या वादानंतर दोन्ही संघटनांकडून मान्यता पुन्हा बहाल झाल्यानंतर पार पडली. त्यामु

 

 

Sandeep Joshi wikipedia
Sandeep Joshi BJP
Sandip Joshi Nagpur
Sandeep Joshi wife
Sandeep Joshi RSS
Sandeep Joshi faridabad
Sandeep Joshi News
Sandeep Joshi BITS Pilani