समृद्धी महामार्गावर अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

0

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. स्विफ्ट गाडीने धडक दिल्यामुळे एर्टिका गाडी ही महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली.

 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी वर काढण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींपैकी तिघांची ओळख पटलेली आहे. अल्ताफ मन्सूरी, शकील मन्सूरी आणि राजेश अशी तीन जखमींची नाव आहेत.