संभाजी ब्रिगेड आक्रमक

0

 मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले

(Nashik)नाशिक : मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नाशिकच्या मेहेर सिग्नल येथे (Sambhaji Brigade)संभाजी ब्रिगेडतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यानी (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Deputy Minister Ajit Pawar)उपुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो,पोस्टर फाडले. यावेळी टायर जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी आधीच आंदोलनकर्त्यांना रोखले. या दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी करताना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली.