

(Amravti)अमरावती -विदर्भामधला मुख्यमंत्री असताना कामे झाले नाहीत. त्याच्यापेक्षा जास्त कामे आता आम्ही करू शकतो. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही व राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिंडे यांचा आमदार बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. (Sambhaji Bhinde)संभाजी भिंडे हे जेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाही हे त्यांनी या वक्तव्यामुळे सिद्ध करून दाखवले . परधर्मीयाने असे काही बोलले असते तर तांडव झाले असते. खरेतर हा देशद्रोहच आहे अशी टीका आ बच्चू कडू यांनी भिंडे यांच्यावर केली. दरम्यान, अपंगांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे. गेल्या अनेक वर्षा पासून सातत्याने यासाठी (MLA Bachu Kadu)आमदार बच्चू कडू प्रयत्न करीत होते. आता एक हजारा वरून पंधराशे रुपये अपंगांना मानधन मिळणार आहे याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. अपंगांना अगोदर सहाशे रुपये, नंतर एक हजार रुपये मिळत होते. मी तर भाग्यवान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दिव्यांग मंत्रालय झालं, पगार वाढले आमच्या मतदार संघात जे कामे रखडले होते.ते आता पूर्ण होतं आहेत.