
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केले. याचा राज्यभरातून निषेध होत आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे वक्तव्य कुणीच करु नये आणि भिडे गुरुजींनीही करु नये. यामुळे लोकांमध्ये संताप तयार होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.