

15 सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा गौरव
ग्रामायण प्रतिष्ठानचे अभिनव उपक्रम
(Nagpur)नागपूर, दि. 25 डिसेंबर 2023 : ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात 75 वरील वर्षावरील पुरुष आणि 70 वर्षावरील महिला ज्या सातत्याने समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत, अशा निवडक तीन ज्येष्ठ समाजयोद्धांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सत्कारमूर्तीत वसंतराव देवपुजारी (वय 97 वर्ष), श्रीमती (Varsha Kheersagar)वर्षा क्षीरसागर (वय 90 वर्ष), (Adv.Prabhakar Rao Marpakwar)ऍड.प्रभाकर राव मारपकवार (वय 76 वर्ष) यांचा समावेश होता. तसेच विवाहाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा सत्कार झाला.
यावेळी मंचावर ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे व अनुराधा सांबरे, सचिव संजय सराफ व सुरेखा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामायण प्रदर्शनातला सोमवार, २५ डिसेंबर हा दिवस ज्येष्ठांसाठी राखून ठेवण्यात आला होता. या दिवशी 75 वरील वर्षावरील पुरुष आणि 70 वर्षावरील महिला ज्या सातत्याने समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत, अशा निवडक तीन ज्येष्ठ समाजयोद्धांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या तिन्ही व्यक्ती नागपूर शहरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. श्री वसंतराव देवपुजारी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी भारतीय मजदूर संघ, सहकार भारती, सहकार सोसायटी, स्वामी विवकानंद मिशन खापरी आणि जाणता राजा नाट्य प्रतिष्ठानमध्ये काम केले आहे.
श्रीमती वर्षा क्षीरसागर या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. त्यांनी राष्ट्र सेविका समिती, शक्ती पीठ रामनगर, महिला समाज रामनगरमध्ये काम केले आहे. त्यांनी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. ऍड.प्रभाकर राव मारपकवर हे सामाजिक कार्यकर्ते आणि बँकिंग क्षेत्रातील माजी अधिकारी आहेत. ते ४० वर्षांपासून बँकिंग संघटनेत अध्यक्ष आहेत. ते नागपुर सहकारी रुग्णालय आणि टेकडी गणेश मंदिरातही कार्यरत आहेत. या सर्व व्यक्तींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. ज्येष्ठ नागरिक पुरस्कार सन्मानपत्र लेखन व वाचन अनिल शेंडे यांनी केले.
पन्नासहून अधिक वर्षे सुखी संसार केलेल्या जोडप्यांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार
भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणारा, पन्नासहून अधिक वर्षे सुखी संसार केलेल्या निवडक काही सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. या जोडप्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ आणि सुखी वैवाहिक जीवनाचे कौतुक केले. सत्कार झालेल्या जोडप्यात सुरेश तारे व शुभांगी तारे, श्री. मधुसूधन के. अलकारी, शोभा अलकारी यांच्या विवाहाला ६५ वर्षे पूर्ण झालीत. याशिवाय डॉ. विजय चिटगोपकर व देवयानी चिटगोपकर, श्री. हुकुमचंद मिश्रीकोटकर व सुमन मिश्रीकोटकर, दत्ता तुंबडे व दिपाली तुंबडे, सुरेंद्र पेंढारकर व जयश्री पेंढारकर, किशोर ना. निचकवडे व शुभांगी निचकवडे, विजय नाईक व छाया नाईक, शिवशंकर उईके व जानवी उईके, आनंद महाजन व सौ. पुष्पलता महाजन, अमोल महाजन व रत्नप्रभा महाजन, मुकुलराव खोत व मृणाल खोत, जगदीश सुकळीकर व सीमा सुकळीकर, श्री. छबनराव पडोळे व शिलाताई पडोळे यांचा समावेश आहे. या जोडप्यांचे उदाहरण इतरांना प्रेरणा देणारे आहे. ते आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांप्रती आदर या मूल्यांचे पालन करत आहेत. सन्मानपत्राचे लेखन, वाचन व संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.