देवळी पुलगाव येथे दिव्यांगांसाठी  समाधान शिबिराचे आयोजन

0

वर्धा (Wardha):-   जिल्ह्यात दिव्यांगांच्या योजना पोहोचू न शकलेल्या देवळी  तालुक्यात  वर्धा जिल्हा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीच्या वतीने कवठा रेल्वे, कवठा झोपडी, पुलगाव शहर तसेच गौळ येथे सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी  दिव्यांग निराधार निराश्रीत वंचित घटकांसाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शासनाच्या योजनांचा गरजूंना लाभ मिळावा असे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकजजी भोयर यांची भूमिका आहे.आ.राजुभाऊ बकाने तसेच जिल्हा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य तथा वर्धा जिल्हा भाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांच्या तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती गरजू लाभार्थ्यांना या शिबिरात देण्यात आली.

दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय राशन कार्ड, नगरपरिषद, ग्रामपंचायतचा दिव्यांग पाच टक्के निधी, बाल संगोपन योजना जिल्हा परिषदेच्या शिलाई मशीन, विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर  सायकल तसेच शिष्यवृत्ती, अनुदानावर कर्ज, अपंग वित्त विकास महामंडळाच्या योजना, मनरेगा अंतर्गत रोजगार, दिव्यांग बचत गट तयार करणे, अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र एलएमकोचे साहित्य वाटप, दिव्यांग विवाह योजना, घरकुलासाठी पट्टे वाटप अशा विविध योजनांची माहिती संजय जाधव यांनी दिली.

पुलगाव येथे झालेल्या समाधान शिबिरात वर्धा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष प्रशांत इंगोले, पुलगाव नगरपरिषद दिव्यांग विभागाचे आश्विन फुलझेले, पुलगाव शहर भाजपा दिव्यांग आघाडीच्या अनिता आठवले, रूपाली काथोटे, सरोज हिवसे, चेतन चौधरी व अनेक पदाधिकारी महिला उपस्थित  होत्या.
येत्या काळात पुलगाव देवळी येथे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समाधान शिबिराचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येईल असे  सांगितले. नगरपरिषद पुलगाव येथील दिव्यांग विभागाचे फुलझेले यांनी दिव्यांगांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आठ लाख रुपयांची तरतूद करून २६६ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी २५४५ रू.निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले.

संजय जाधव यांनी उपस्थित अनेक दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण केले. अनिता आठवले पुलगाव,अल्लीपूर जिल्हा परिषद सर्कलचे भाजपा दिव्यांग आघाडीचे प्रशांत बागवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.दुपारी तीन वाजता गौळ येथील हनुमान मंदिरात दिव्यांग समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. . ग्रामपंचायतचे कर्मचारी दशरथ मलमापूरे रोजगार सेवक सोपान शेलकर हे उपस्थित होते.
समाधान शिबिराचे यशस्वीते करिता गावातील दिव्यांग आघाडीचे सतीश ठाकरे, वैभव जगताप, किशोर जगताप व अनेक गावकऱ्यांनी सहकार्य केले.