सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

0

अनुज थापनने तुरुंगातील चादरीने घेतला गळफास

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आलं होतं, त्यावेळी थापन इतर १० आरोपींसह एका कोठडीत होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधीत असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.

मोदींचा संविधान बदलण्याचा डाव
शरद पवार यांचा हातकणंगलेत घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी संविधान बदलणार नसल्याचे सांगतात. पण त्यांचे खासदारच 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर असे करण्याचा दावा करतात. यातून मोदींचा खरा डाव लक्षात येतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची काय गरज होती? असा सवालही उपस्थित केला.

तंबाखू तस्करांच्या आवळल्या मुसक्या
दोन अट्टल तंबाखू तस्करांसह मोठा मुद्देमाल केला जप्त

चंद्रपूर शहरातील वेकोली महाव्यवस्थापक शासकीय निवासस्थानामागे असलेल्या भागात सुगंधित तंबाखू साठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धाड घातल्यावर महेश गुप्ता याचे घरात ईगल हुक्का, सुगंधीत तंबाकु, होला हुक्का, मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण २,१४, २२०/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी महेश गुप्ता चंद्रपुर याने नामीत केलेल्या जयसुख ठक्कर या अट्टल तंबाखू तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तर दुसऱ्या एका कारवाईत चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वॉर्डातील हनुमान आंबटकर याच्या किराणा दुकानाची सुगंधीत तंबाकुबाबत झडती घेवुन त्याचे घरून ईगल हुक्का- सुगंधीत तंबाकु असा एकूण 4 लाखांचा माल जप्त करण्यात आला. हा माल रयतवारी कॉलरी निवासी अमरदिप गुप्ता या तस्कराचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

नाशिकची जागा अखेर शिंदे गटाला सुटणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान
नाशिकची जागा अखेर शिंदे गटाला सुटणार असल्याचे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे. नाशिकची जागा १००% शिवसेनेचीच असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदेच घेतील असे बावनकुळे म्हणाले. तर पालघरच्या जागेवर भाजपकडून उमेदवार घोषित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या
मृत्यू झाल्याची पुष्टी अद्याप नाही
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या करण्याता आल्याचा दावा करण्यात आला आहे. डल्ला-लखबीर गँगने याची जबाबदारी घेतली असून गुन्हे जगतात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी गोल्डी त्याच्या फेयरमोंट, होल्ट एवेन्यू येथील घरासमोर उभा असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गोल्डीसोबत त्याचे साथीदारही होते. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोल्डीचा मृत्यू झाल्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

पाणी टंचाईच्या झळा तीव्र
अहमदनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला
अहमदनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशा टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे रोज टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली असून, सद्य:स्थितीत टँकरची संख्या २६२ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ८९ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. तर ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे

पुण्यात विक्रमी तापमानाची नोंद
पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला
पुणे शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. पुण्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चंकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आजचे तापमान ४१.८ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. पुढील २ ते ३ दिवस तापमानाचा आकडा असाच राहण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे इथं काल उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात देखील विक्रमी तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यात पुणे शहराने ६ वेळा पार केला ४० डिग्री तापमान नोंदवलं गेलं.