

धर्मभास्कर सद्गुरुदास महाराजांना ‘ प्रबोधरत्न ‘ पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान
पुरस्कार निधी विष्णुदास महाराज सेवा आश्रमाला अर्पण
दिनांक २० ऑक्टोबर २०२४ : मिळालेल्या उपाधीने केवळ भारावून नं जाता संतांनी उपाधीचा विस्तार करावा आणि तिचा वापर धर्मरक्षणासाठी करावा असे प्रतिपादन धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांनी केले. आपण पुरस्कार लक्षात न ठेवता , देणाऱ्याचे प्रेम आणि भावना लक्षात ठेवाव्या असे देखील ते म्हणाले. धर्मभास्कर श्री सद्गुरूदास महाराज यांना, त्यांनी गेल्या ६१ वर्षांपासून केलेल्या धर्म, संस्कृती, इतिहास क्षेत्रातील भरीव समाज प्रबोधन कार्याच्या गौरवार्थ ‘ प्रबोधरत्न ‘ पुरस्कार सार्वजनिक उत्सव समिती दिल्ली, महाराष्ट्र मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव समिती गुरुग्राम ( हरियाणा ) यांच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी ते उपस्थितनांना उद्बोधन करताना बोलत होते.
यावेळी मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ६१ हजारांचा रोख देऊन सद्गुरुदास महाराजांचा सन्मान करण्यात आला. पुरस्काराची रक्कम आपण लगेचच विष्णुदास महाराज सेवा आश्रमाला अर्पण करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
चिन्मय गुरुधाम, गुरूग्राम येथे पत्रभेट ” मासिकाच्या ‘अष्टलक्ष्मी दिवाळी’ अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्वांचल महाराष्ट्र मंडळाचे श्री प्रवीर चित्रे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री जीवन तळेगावकर आणि डॉ चेतन शेलोटकर होते.
तसेच सद्गुरुदास महाराजांचे वैदिक श्रीसुक्तावर प्रवचन संपन्न झाले. महालक्षमीचे सूक्त याचे महत्व सांगताना महालक्ष्मी कश्या प्रकारे ब्रह्मानंदाचा समतोल राखतात आणि महालक्ष्मी सूक्त आणि स्रोत पठण , वाचन सर्वांसाठी कसे उपयुक्त आहे यावर सद्गुरूदास महाराजांनी प्रकाश टाकला. श्रीसूक्तात वैदिक काळातील अर्थशास्त्राचे चिंतन लक्ष्मी व लक्ष्मीचे स्वरूप स्पष्ट केले आहे, वैदिक अर्थशात्र भक्तीतून तर पाश्चात्यअर्थ शास्त्र भुकेतून निर्माण झाले आहे असे त्यांनी विशद केले.
अविनाश जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्र संचालन डॉक्टर रेवती देशपांडे ह्यांनी केले. सुरवातीला शिवस्तुतीपर कथक, अर्धनरी नटेश्वर -अर्धांग नाटिकेचे -वीणा स्वामिनाथन यांनी सादरीकरण केले.पत्रभेटचे प्रास्ताविक सौ. प्रज्ञा फडणीस ह्यांनी केले.या आनंद सोहळ्यात अनेक भक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन सहभागी झाले. विष्णु पाटील, शांताराम उदागे, डॉक्टर सौ. रेवती देशपांडे, सौ. प्रज्ञा फडणीस, श्री सुजित देशपांडे, अर्चांना इनामदार, सौ. स्मिता काटेकर, सौं. वर्षा वेलांकीवार, सौं. अपूर्वा मार्डीकर, श्री. अमर देशपांडे, श्री. विरेन अगस्ती, श्री. मनीष उद्धव या सर्वांचे सद्गुरूदास महाराजांनी अभिनंदन केले.