

१ आॅक्टोंबर २०२३ रोजी शंखनाद आंदोलन
नागपूर विभागातून ३००० कर्मचारी दिल्लीत जाणार
नागपूर – जुनी पेन्शनची लढाई अधिक निकराने लढून दिल्लीचे तख्त हलविण्यासाठी महाराष्ट्रातून जवळपास २५ हजार पेन्शनधारक दिल्ली येथील रामलीला मैदानावर रविवार १ आॅक्टोंबर २०२३ रोजी आयोजित पेन्शन शंखनाद आंदोलनात सहभागी होणार आहे. या आंदोलनात नागपूर विभागातून ३००० कर्मचारी सहभागी होणार असल्याचे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री आशुतोष चौधरी यांनी सांगितले.
शासकीय सेवेत असलेल्या नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना ही अन्यायकारक पेन्शन योजना लागू केली. राज्य सरकारनी सुध्दा केंद्र सरकारची री ओढत नवीन पेन्शन योजना लागू केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आंदोलनकर्त्या कर्मचार्यांच्या जखमेवर मीठ चोळत जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही असे सांगितले. तर ज्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली त्या राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील १८ लाख कर्मचार्यांनी जुन्या पेन्शनसाठी वज्रमुठ तयार केली असून No Pension No Vote ही मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय पुरानी पेन्शन बहाली संघटनेचे (NMOPS) राष्ट्रीय अध्यक्ष विजय बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष व NMOPS चे राष्ट्रीय उपाध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शंखनाद फुंकण्यात येणार आहे. या आंदोलनात नागपूर विभागातून विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ पूर्ण ताकतीनिशी सहभागी होणार असून जुन्या पेन्शनच्या लढाईसाठी शंखनाद फुंकणार असल्याची माहिती शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे यांनी दिली. शनिवार ३० सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरुन मोठ्या संख्येने कर्मचारी दिल्लीकडे कूच करणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कार्याध्यक्ष श्री आशुतोष चौधरी यांनी दिली.
विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाची टिम शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, भिमराव शिंदेमेश्राम, नरेश तेलकापल्लीवार, राजू भस्मे, गौरीशंकर साठवणे, माधव काठोके, विलास उईके, संजय अहाके, सतीश कुथे, ज्ञानेश्वर कामडी, सुरेश बेलनकर, पवन कामडी (रामटेक), उत्तम गि-हेपुंजे, विवेक ढोबळे, संजय काळे, राजेश इटकिकार यांच्या नेतृत्वाखाली रवाना होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची टिम राज्य कार्याध्यक्ष श्री आशुतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भूषण आगे, अनिल वाकडे, सचिन इंगोले, पुरुषोत्तम हटवार, अनिल पत्रे, मंगेश धाईत, आशिष तिरपुडे, विकास गणवीर, दिलीप ढोमने, प्रशांत मोहितकर, सुरज येले, सुरज वैद्य, नितीन माकोडे, भारत आघाव, प्रशांत गभने, मालती चकोले, सोनाली ढोमने, अंजली गणवीर, सपना मानकर यांच्या नेतृत्वाखाली रवाना होणार आहे.
दिल्लीचे तख्त वाचविण्यासाठी सदैव सह्याद्री धावून आला. मात्र आता जुनी पेन्शन योजनेसाठी दिल्लीचे तख्त हलविण्यासाठी सह्याद्री जाणार आहे. केंद्र सरकारने तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी.
श्री मिलिंद वानखेडे
शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष
विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग