
(Nagpur)नागपूर, 10 ऑक्टोबर
प्रसिद्ध लेखिका संगीता थोरात यांच्या ‘नकळत…’ कादंबरीला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ठाणे ह्यांच्या द्वारे दिला जाणारा साहित्यक्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार-२०२३’ प्राप्त झाला. पुरस्कार वितरण सोहळा जेष्ठ गझलकार सुरेश भट साहित्यनगरी नारायणम् विद्यालय, वर्धा रोड, सोमलवाडा चौक येथे पार पडला. (Pandit Shankarprasad Agnihotri) पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते (Sangeeta Thorat) संगीता थोरात यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कादंबरीला मिळालेला हा सलग तिसरा पुरस्कार आहे. याआधी कोमसाप ठाणे आणि कल्याण शाखेने राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून ‘नकळत’ ला ‘साहित्यगंध’ या पुरस्काराने गौरवीले असून साहित्यसंपदा संस्थेचा ‘आशादीप’ पुरस्कारदेखील या कादंबरीला प्राप्त झाला आहे.