RSS | संघाच्या शाखेत राष्ट्रभक्तीचे धडे!

0

संघाच्या शाखेत शिस्तबद्ध स्वयंसेवक, राष्ट्रभक्त नागरिक, समाजसेवी संघटना तयार होतात- प्रसाद शिंगेवार यांचे प्रतिपादन

रा. स्व. संघाचा , सोमलवाडा भागातील बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव शनिवारी दि. ५ ऑक्टोबर २०२४ ला उज्ज्वल नगर येथील श्रीराम मंदिर संघस्थानावर संपन्न झाला. उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. सौ. सुजाता देशमुख उपस्थित होत्या तर, प्रमुख वक्ते, महानगर सहशारीरिक प्रमुख प्रसाद शिंगेवार होते.

कार्यक्रमाची सुरुवात पथ संचलनाने झाली.त्यानंतर स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध प्रात्यक्षिके सादर केली ज्यामध्ये शिशु स्वयंसेवकाचे रूमाल योग,बाल स्वयंसेवकांचे नियुद्ध, दंड प्रयोग, सामुहिक समता, दंड व्यायाम योग यांचा समावेश होता. विविध प्रात्यक्षिकांतून स्वयंसेवकांनी शरीराची लवचिकता, एकाग्रता, चपळता, सांघिकता, शिथिलता अशा अनेक गुणसम्मुचयांचा परिचय दिला.

डॉ.सौ. सुजाता देशमुख यांनी आपल्या उद्बोधनात लहान मुलांच्या समस्यांवर मंथन केले. त्यांनी उपस्थित बाल-शिशुस्वयंसेवकांना पाच शपथा घेण्याचे आवाहन केले.१) डिजीटल उपवास,२) व्यवस्थित आहार (पॅकेज फुड टाळणे आणि सकस अन्न घेणे), ३)ध्यान धारणा करणे, ४)नियमित व्यायाम करणे आणि ५)घरातुन बाहेर पडताना आईवडिलांना किंवा ज्येष्ठांना नमस्कार करणे. ह्या शपथा कश्या उपयोगी आहेत ते त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले.

यानंतर प्रमुख वक्ते प्रसाद शिंगेवार यांनी भारतातल्या विविध संघ स्वयंसेवकांची उदाहरणे देऊन संघात स्वयंसेवक मी समाजाला काही तरी देणं लागतो हा विचार सतत कसा करतो हे दाखविले.संघाच्या शाखेमध्ये शिस्तबद्ध स्वयंसेवक, राष्ट्रभक्त नागरिक आणि समाजसेवी संघटना तयार होतात असे ही ते म्हणाले. यावेळी मंचावर सोमलवाडा भाग कार्यवाह धनंजय कारखानीस उपस्थित होते.कार्यक्रमात,परिसरातील गणमान्य नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.