
असे का म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मुंबई MUMBAI : बारामती अॅग्रो Baramati Agro प्रकरणात ED ईडीच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांची चौकशी सुरु झाली आहे. तत्पूर्वी, शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन ते ईडी कार्यालयाकडे गेले. त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे गेल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. ‘सत्यमेव जयते. विजय हा सत्याचाच होईल. हा काळ संघर्षाचा आहे. आव्हान येत आहेत पण, आव्हानांवर मात करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो. रोहित पवारांना नोटीस येणे ही आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. त्यामुळे सूडाचे राजकारण केले जात आहे, असे त्या म्हणाल्या.
आयकर, सीबीआय, ईडीच्या ९० टक्के केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या रोहित पवारांनी संघर्षयात्रा काढली होती. कदाचित हे त्याचेच सूडाचे राजकारण असू शकते. हे शक्तीप्रदर्शन नाही. यात प्रेम आणि नाती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांच्या भावासाठी इथे यावेसे वाटते. आम्ही काही चूक केली नसेल, तर तपासाच्या दबावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्या म्हणाल्या. चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष असावी. माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की ते रोहितची बाजू ऐकतील. आम्ही चौकशीला पुर्णपणे सहकार्य करणार आहोत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
दरम्यान, रोहित पवारांवरील कारवाई म्हणजे शरद पवारांना लक्ष्य केले जात आहे का,? असा प्रश्न अनिल देशमुख यांना विचारला असता ते म्हणाले, “चार वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रयत्न केला. शरद पवारांनाच त्यांनी ईडीची नोटीस पाठवली. सुरुवात त्यांनी शरद पवारांपासून केली. त्यामुळे शरद पवारांवर कोणीही दबाव आणू शकत नाही. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष रोहित पवारांच्या पाठिशी आहेत. रोहित पवार आमचा तरुण सहकारी आहे त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत, असेही ते म्हणाले.